Gallery
Award & Achievements
Dr. Ujwala Dahiphale, Ad. Kalpalata Patil Bharaswadkar and Vaishali Kenekar awarded first Durga honor of ‘The Focus India’
समाजातल्या दुष्ट शक्तींविरुद्ध लढवून सुष्ट शक्तींना बळ देणारी दुर्गा… स्त्रीशक्तीचे हे रूप वेद – पुराणांनी कल्पिलेले आहे. या स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान, तिच्या लढ्याला केलेला मानाचा मुजरा म्हणून ‘द फोकस इंडिया’च्या वतीने पहिला दुर्गा सन्मान स्त्रीशक्तीला समर्पित करण्यात आला ..!
द फोकस इंडियाच्यावतीने देणारा हा पहिला दुर्गा सन्मान पुरस्कार स्त्री सक्षमीकरणाचे उज्ज्वल कार्य करणाऱ्या प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे, ख्यातनाम वकील कल्पलता पाटील- भारसवाडकर आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंटच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली केनेकर यांना प्रदान करण्यात आला . शहरातील अँबॅसिडर अजंठा हॉटेलमध्ये रविवार दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता झालेल्या समारंभात प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते वरील तीनही महनीय व्यक्तींना ‘द फोकस इंडिया’चा दुर्गा सन्मान प्रदान करण्यात आला .